Tuesday, May 29, 2018

मासिक पाळी दरम्यान सेक्स करणे योग्य आहे का जाणून घ्या !



मासिक पाळी दरम्यान सेक्स करणे योग्य आहे का जाणून घ्या ! भारतीय समाजात मासिकपाळी व स्त्री या विषयाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत.धार्मिक रुढी व परंपरांचा समाजजीवनावर पगडा आहे. जेथे या काळात स्त्रीलाच सार्‍यांपासुन लांब ठेवले जाते , तेथे मासिकपाळी दरम्यान सेक्स करावा की करू नये हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुमच्या मनातील अशाच काही शंका आणि त्याची उत्तरे जरुर वाचा.


मासिकपाळी दरम्यान सेक्स केल्याने गर्भधारणा टाळता येते का ?

मासिकपाळी दरम्यान सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता तशी विरळच आहे. स्त्री शरीरात निरुपयोगी अंड जरी राहिले असले तरीही या काळात गर्भाशयातील त्वचेचे अस्तर बाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया सुरू असते. तसेच गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली हार्मोन्स या काळात शरीरात उपलब्ध नसतात त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते.

क्वचित प्रसंगी, जेव्हा मासिक पाळी दरम्यान सेक्स करून देखील गर्भधारणा झाल्याचा दावा केला जातो तेव्हा ते रक्त पाळीदरम्यानचे नसुन संभोग झाल्यानंतर बीज गर्भाशयातील अस्तराला चिकटल्याने झालेला रक्तप्रवाह असतो. म्हणूनच जर अनावश्यक गर्भधारणा टाळायची असेल तर सुरक्षित सेक्सचा नेमका काळ जाणून घेणे गरजेचे आहे.

मग, मासिकपाळी दरम्यान सेक्स करताना , कंडोम व इतर सुरक्षेचे उपाय करण्याची गरज नाही ?
हा एक चुकीचा समज आहे की, या काळात सेक्स करताना सुरक्षेची काही गरज नाही. मासिकपाळी दरम्यान सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असली तरीही या दरम्यान केलेल्या सेक्समुळे लैंगिक आजार व
जंतूसंसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. म्हणून सेक्सदरम्यान कंडोम व सुरक्षेचे उपाय घेणे फार गरजेचे आहे. पण कंडोम वापरताना या चूका अवश्य टाळा.


मासिकपाळी दरम्यान सेक्स करण्यासाठी स्त्रीयांना राजी कसे करायचे ?

मासिकपाळी दरम्यान स्त्रिया मानसिक व शारिरीक बदलांमधून जात असतात. सतत मूड बदलणे, पोटात दुखणे, कंबरदुखी यासारख्या समस्यांशी झगडत असतात त्यामुळे त्या सेक्स करण्यासाठी फार राजी नसतात. मात्र पाळीदरम्यान स्त्रीयांमध्ये
ऑर्गेझम
(परमोच्च संभोगसुख)
अधिक चांगले असते हे जर तुम्ही तुमच्या साथीदाराला पटवून देऊ शकलात तर त्या तयार होण्याची शक्यता अधिक असते. तसेच या काळात सेक्स केल्याने मासिकपाळीदरम्यान होणार्‍या वेदना व त्रासदेखील कमी होतो. सोबतच


मुलीच्या मासिक पाळी संदर्भात हे आहेत मोठे गैरसमज जाणून घ्या !

आपल्या समाजामध्ये महिलांना येण-या मासिक पाळी संदर्भात कुणीही उघडपणे चर्चा करत नाहीत. मात्र, महिलांच्या याच मासिक पाळीबाबत सर्वात जास्त गैरसमज पसरविण्यात आलेले आहेत. केवळ धार्मिक रूढी-परंपरांच्या नावाखाली हे गैरसमज लहानपणापासून मुलींवर बिंबवले जातात. मात्र, या गैरसमजांवर विश्वास न ठेवता यासंदर्भात डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशाच काही गैरसमजांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


केस धुवू नयेत

नेहमी मुलींना सांगण्यात येते की, मासिक पाळी दरम्यान पहिले दोन दिवस केस धुवू नयेत. मात्र, असे काहीही नाहीये. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर लक्ष देण्याची गरज आहे. गरम पाण्याने आंघोळ केल्याने मासिक पाळीमुळे होणा-या त्रासापासून काहीप्रमाणात मुक्तता मिळू शकते.

मासिक पाळीदरम्यान सेक्स करू नये

मासिक पाळी आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस विकनेस जाणवतो त्यासाठी आराम करण्याची गरज असते. मात्र, मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्याने त्याचा आपल्या सेक्स लाईफवर वाईट परिणाम होतो हा केवळ गैरसमज आहे.

मासिक पाळीदरम्यान आंबट खाऊ नये

लहान मुलांना घाबरविण्यासाठी ज्याप्रमाणे म्हणतात ना की, जे सांगतोय ते ऐकलं नाही तर भुत पकडून नेईल. अगदी त्याच प्रमाणे हे सुद्धा आहे. कारण, मसालेदार जेवणानं पोट खराब होऊ शकतं पण मासिक पाळीमध्ये होणा-या वेदना आणि त्याचा काहीही संबंध नाहीये.

मासिक पाळीदरम्यान काम न करता आराम करावा

मासिक पाळीमध्ये शरीरातून रक्तस्त्राव होतो यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये. तसेच महिला आपलं दैनिक काम अगदी सहजपणे करू शकतात.

या ७ प्रकारच्या व्यक्तींना चुकूनही डेट करू नका!
प्रेमात पडणं हे प्रत्येकासाठीच एक स्वप्न असतं. प्रेमात पडल्यावर प्रत्येकाचं आयुष्य बदललं जातं. तुम्हाला कुणाची काळजी वाटायला लागते, त्या व्यक्तीचा आनंद त्या व्यक्तीचं दु:खं तुम्हाला आपलसं वाटायला लागतं. स्वत:ला विसरून तुम्ही त्या व्यक्तीबद्दल विचार करायला लागता. पण ती व्यक्ती जर चुकीची असेल तर तुमचं मात्र काही खरं नसतं. स्वप्न पूर्ण होण्याऎवजी स्वप्ने तुटायला लागतात. म्हणूनच आम्ही अशा काही व्यक्तींची यादी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यांना चुकूनही डेट करू नका.
१) खोटे बोलणारे:
जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्हाला वाटत असतं की, तुम्ही त्या व्यक्तीला बदलू शकता. पण खरं हे आहे की, खोटा व्यक्ती कधीही बदलू शकत नाही. तो व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तुमच्याशी खोट बोलणार आणि दगा देत राहणार. कधी कधी तर त्याचं खोट बोलणं तुम्हालाही माहिती पडणार नाही. अशा व्यक्तीसोबत आयुष्यातील सर्व स्वप्न बघणं जरा नाहीतर जरा जास्तच अवघड आहे.
२) नाटकी व्यक्ती:
प्रत्येक गोष्टीत काहीतरी मागणी करत राहणारा…सतत कारणे देणारा…व्यक्ती कधीही विश्वास ठेवण्यालायक नसतो. असे व्यक्ती नेहमीच खोट बोलून दूर पळत असतात. अशा व्यक्तीसोबत तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाही.
३) जे तुम्हाला बदलण्याचा विचार करतात:
तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला न स्विकारता तुमच्यात बदल घडवू पाहणा-या व्यक्तीसोबत चुकूनही डेटवर जाऊ नका. तुम्ही जसे आहात तसेच त्याने स्विकारायला हवे. प्रत्येक गोष्टी जी व्यक्ती तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती तुमच्यावर प्रेमच करत नाही. जर त्या व्यक्तीला खरंच तुमच्यावर प्रेम असेल तर त्याने तुम्ही आहात तसा स्विकार करायला हवा.
४) विचारांना महत्व न देणारे:
प्रेमात दोघांचंही नातं सारखंच असतं. तरीही जर तुमचा/तुमची पार्टनर तुमच्या विचारांना महत्व देत नसेल, तर मग तुम्ही लगेच या नात्याबद्दल विचार करायला हवा. ऎकमेकांच्या विचारांना महत्व देणे हे प्रेमात खूप महत्वाचं असतं. माझं एकट्याचंच किंवा एकटीचच खरं आहे, तू म्हणातो ते चुकीचं आहे, असा विचार करणा-या व्यक्तीसोबत आयुष्य आनंदाने कधीही जगता येणार नाही.
५) ज्यांना सॉरीचा अर्थ समजत नाही:
तुम्ही अशा व्यक्ती सोबत तर चुकूनही राहू नका ज्यांना सॉरी या शब्दाचा अर्थही माहिती नसतो. अशा व्यक्ती आयुष्यभर डोक्याला ताप ठरू शकतात. अशा व्यक्तीला सॉरी म्हणता म्हणता तुमचं आयुष्य जाईल. त्याला त्याच्या चुकींचीही जाणिव व्हायला हवी.
६) कन्फ्यूज व्यक्ती:
ज्या व्यक्तीला आयुष्यात काय करायचं आहे, हे महिती नाही. किंवा जी व्यक्ती सतत प्रत्येक गोष्टीत कन्फ्यूज असते अशा व्यक्तीसोबत आयुष्य काढणं खूप अवघड होऊ शकतं. ज्या व्यक्तीला काय करायचं आहे हेच समजत नसेल तर ती व्यक्ती परिवाराला कशी चालवणार..
७) महिलांचा सन्मान न करणारे:
जे व्यक्ती तुमचा सन्मान करतात पण दुस-या व्यक्तींचा मान-सन्मान ठेवत नाहीत, अशांच्या दहा हात दूरच राहिलेले बरे. अशा व्यक्तींना जराही जवळ करता कामा नये. जे व्यक्ती महिलांचा सन्मान करू शकत नाही ते पुढे चालून तुमचाही सन्मान करणार हे कशावरून?

संकलित: सुशिल म. कुवर 

Monday, May 28, 2018

मासिक पाळी म्हणजे काय..?


मासिक पाळी म्हणजे काय..?

मुलगी वयात आल्यावर म्हणजे साधारण 11 ते 14व्या वर्षी योनीमार्गातून दर महिन्यास दोन ते पाच दिवस जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी येणे असे म्हणतात.
दोन ते पाच दिवस रक्तस्राव झाल्यावर त्या महिन्यातील पाळी थांबते. त्यानंतर मासिक पाळी पुन्हा 25 ते 28 दिवसांनी येते. अशाप्रकारे मासिक चक्र स्त्रियांमध्ये सुरू असते. त्यानंतर साधारण वयाच्या 40 ते 55 च्या दरम्यान कधीही हळुहळू पाळी येणं बंद होते त्याला मेनोपॉज (रजोनिवृत्ती) असे म्हणतात.

मासिक पाळी येणे पुर्णतः नैसर्गिक क्रिया असून मानवी वंशावळ वाढविण्यासाठी, प्रजननासाठी अत्यंत आवश्यक असते. मासिकपाळी सुरु झाली म्हणजे मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरु झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील ती एक महत्त्वाची घटना असते. प्रत्येक मुलीचे मासिक पाळी येण्याचे वय वेगवेगळे असू शकते पण जर 16व्या वर्षापर्यंत मासिक पाळी आली नाही तर तात्काळ स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे असते.

मुलगी वयात आली की दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित हे आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्त्राव होतो. त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. मासिक पाळी आल्यावर 2 ते 5 दिवस रक्तस्राव होऊ शकतो.

मासिकपाळी होताना काही त्रास होतो का..?
मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा आल्यावर काही स्त्रियांना थोडपार त्रास जाणवू शकतो. यामध्ये डोके दुखणे, कंबर दुखणे, पोटात दुखणे, झोप न लागणे, अंगदुखी यासारखा त्रास होऊ जाणवू शकतो.

पुन्हा मासिक पाळी किती दिवसांनी येते..?

कोणाला 24 दिवसांनी तर काहींना 29 दिवसांनीही येईल. एकद-दुसरा दिवस मागे पुढे होऊ शकतो यामध्ये नियमितता असत नाही. साधारणपणे मासिक पाळी पुन्हा 25 ते 28 दिवसांनी येते.

कोणती काळजी घ्यावी..?

• मासिकपाळी चालू असताना पूर्ण विश्रांतीची अजिबात गरज नाही. मात्र अतिकष्टाची कामे करू नयेत. घरातील नेहमीची कामे करावीत. ज्यांना पोटदुखी किंवा कंबरदुखी याचा अधिक त्रास असेल किंवा अंगावरून जास्त जात असेल तर मात्र विश्रांती घ्यावी.
• ‎मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज असते. पाळीच्या काळात रोज सकाळी गरम पाण्याने आंघोळ करावी.
• ‎या दिवसात या मासिक रक्तस्राव शोषण्यासाठी योनीमार्गाशी कापडाची घडी किंवा सॅनिटरी नॅपकिन ठेवावा लागतो.
• ‎बाजारात मिळणारे सॅनिटरी नॅपकिन हे चांगले असले तरी अनेकांना परवडणारे नसतात. अशावेळी या काळात सुती कापडाच्या घड्याही आपण वापरु शकता. वापरावयाचे कापड हे स्वच्छ धुवून, कोरडे केलेलेच असावे.
• ‎मासिक पाळीसंबंधी जुनाट विचारांना बळी पडू नका.

मासिक पाळी पुढे ढकलता येते का..? आणि असे करणे योग्य आहे का..?

आज तरुणींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मासिकपाळी पुढे ढकलणार्‍या गोळ्या घेण्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे. त्या गोळ्यांचा गंभीर परिणाम आरोग्यावर होत असतो. एखादवेळेस अशा प्रकारच्या गोळ्या घेणे ठीक आहे. मात्र त्याची सवय लावू नका. यामुळे मासिकपाळीचे नैसर्गिक चक्र बिघडते. ह्या ना त्या कारणांसाठी मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी वरचेवर गोळ्या घेणे योग्य नाही. असे करण्याने भविष्यात अनेक गंभीर समस्या उदभवू शकतात. कारण या गोळ्यांचे स्त्रियांवर दुष्परिणाम होऊ शकतात.

मासिक पाळीच्या वेळी संबंध ठेवणे योग्य की अयोग्य..?
दोघांचीही मानसिक तयारी असल्यास मासिक पाळीच्या काळात संभोग करण्यास काही हरकत नाही. पण स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास ही विचारात घेणे गरजेचे असते.

संकलन : सुशिल म.कुवर
फोटो : प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.